श्रीशैल जगद्गुरू द्वादश पिठारोहणाच्या औचित्याने २९ ऑक्टोबर ते १५ जानेवारीपर्यंत विविध धार्मिक, सामाजिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून येडूर ते श्रीशैलपर्यंत, श्रीशैल जगद्गुरूंच्या नेतृत्वाखाली पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
व्हॉइस : याबाबत आज श्रीशैल जगद्गुरू यांच्या उपस्थितीत बेळगावमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना श्रीशैल महास्वामी म्हणाले, पर्यावरण जनजागृती, धार्मिक जागृती, सेंद्रिय शेती जनजागृती आणि आरोग्य जागृतीसाठी २९ ऑक्टोबर ते १५ जानेवारीपर्यंत विविध धार्मिक, सामाजिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अंदाजे ५६० किलोमीटर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले असून इतर अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती श्रीशैल जगद्गुरूंनी दिली. बेळगावमधील चिकोडी तालुक्यातील श्री वीरभद्रेश्वराच्या सानिध्यात २० ऑगस्ट रोजी पदयात्रेची सुरुवात होणार असून सदर पदयात्रा बागलकोट, विजापूर, यादगिरी, रायचूर यासह विविध गावात संचार करून पुढे आंध्रप्रदेश हुन पुन्हा श्रीशैल येथे पदयात्रा पोहोचेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
पदयात्रेची सांगता झाल्यानंतर श्रीशैल जगद्गुरू अनुष्ठान करणार असून त्यानंतर नित्यनेमाने श्री जगद्गुरू पंडिताराध्यांच्या मूर्तीला रुद्राभिषेक, बिल्व पत्रार्पण व महामंगलारती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


Recent Comments