लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत दिवंगत कन्नड चित्रपट अभिनेता पुनित राजकुमार यांना ‘कर्नाटक रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरात आज महत्वाची बैठक घेतली.

पुनित राजकुमार यांना ‘कर्नाटक रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यासंदर्भात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज आपले गृह कार्यालय कृष्णा येथे बैठक घेतली. यावेळी मंत्री व्ही. सोमन्ना, आर. अशोक, डॉ. सुधाकर, गोपालय्या, सुनीलकुमार, बैराती बसवराज, अश्विनी पुनित राजकुमार आणि राघवेंद्र राजकुमार आदी उपस्थित होते.


Recent Comments