हायस्कूलच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावच्या शिवारात घडली आहे.

काल रात्री एका विद्यार्थ्याची हत्या करून अज्ञात मारेकऱ्यांनी मुचंडी गावाबाहेर त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे आज दुपारी उघडकीस आले. बेळगावच्या शिवाजी नगर येथील रहिवासी प्रज्वल शिवानंद करिगार या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील एका खासगी हायस्कूलमध्ये शिकणारा विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्याच्या शालेय गणवेशाचा बेल्ट आढळून आला आहे. त्यावरून तो बेळगावच्या खासगी हायस्कूलमध्ये दहावीत शिकणारा विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. हत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. एका कोवळ्या विद्यार्थ्यांचा अशा पद्धतीने निर्घृण खून झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
डीसीपी रवींद्र गडादी, ग्रामीण विभागाचे एसीपी गिरीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ही घटना मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून मारिहाळ पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.


Recent Comments