दिव्यांग आणि मतिमंदांच्या विकासासाठी आपण त्यांना देवाची मुले म्हणून सांभाळून, त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून पाहिले पाहिजे असे बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव येथील त्यांच्या गृहकार्यालयात आज परिसरातील विविध गावांतील नेत्यांच्या उपस्थितीत ग्रामीण भागातील तीन दिव्यांगांना तीनचाकी वाहने सुपूर्द केली. त्या नंतर बोलताना त्यांनी, आपल्या समर्थकांना अपंगांसाठी विशेष कळकळ असायला हवी, अपंगांप्रती कळवळा असण्याबरोबरच त्यांना आवश्यक ती साधने देऊन त्यांना समाजातील इतरांप्रमाणे पुढे येण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, नागेश देसाई, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, भागण्णा नरोटी यांच्यासह विविध गावचे नेते, कार्यकर्ते व निकटवर्तीय उपस्थित होते.


Recent Comments