Belagavi

एम के हुबळीत उद्भवली पाण्याची समस्या

Share

कित्तूर तालुक्यातील एम के हुबळी या शहरात पाण्याची समस्या उद्भवली असून गेल्या ८ दिवसांपासून या भागात पाण्याने दांडी मारली असून याविरोधात आज येथील नागरिकांनी रिकामी घडे घेऊन आंदोलन छेडले.

एम के हुबळी या शहरातील प्रभाग क्रमांक १, २, व ३ या भागात गेल्या आठ दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नाही. पाण्याविना येथील नागरिकांचे हाल होत असून संतप्त नागरिकांनी हातात रिकामे घडे घेऊन स्थानिक प्रशासनाचा निषेध केला.

यावेळी बोलताना राजशेखर हिंडलगी म्हणाले, गेल्या ८ दिवसांपासून या भागात पाणी पुरवठा झाला नाही. पाण्यासाठी या भागातील महिलांना एक किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागत

असून पाण्याची समस्या वेळीच सोडवली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

या आंदोलनात श्रीकांत सकरेन्नावर, बसवराज सकरेन्नावर, कस्तुरव्वा तळवार, नागव्वा पागद, शांतव्वा राणोजी, नागाप्पा मुत्तेन्नावर, अदृश्य हिंडलगी आदी सहभागी झाले होते. कित्तूर उत्सव जवळ आला असून येथील लोकप्रतिनिधी या उत्सवाच्या तयारीत गुंतले आहेत. मात्र येथील जनता पिण्याच्या पाण्याअभावी त्रास सहन करत आहे. जनतेच्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष पुरवून तातडीने हि समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.

Tags:

mk-hubli-villegers-protest-for-drinking-water/