Belagavi

28 रोजी कोटी कंठगीत गायनाचा कार्यक्रम

Share

राज्य शासनाच्या निर्देशानुसार कर्नाटक राज्योत्सवाचा एक भाग म्हणून 28 ऑक्टोबर रोजी राज्यभरात एकाच वेळी एक कोटी कंठगीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची आवश्यक ती तयारी करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी दिले.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज, गुरुवारी कर्नाटक राज्योत्सवाचा एक भाग म्हणून राज्यभरातील कोटी कंठ गीत गायनाच्या कार्यक्रमाच्या तयारीबाबतच्या प्राथमिक बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सुवर्ण विधान सौध आणि जिल्हा स्टेडियम अशा जिल्ह्यातील 2 ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी सुवर्ण विधानसौधसह केएलई संस्थेच्या जिरगे सभा भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागा कमी असल्याने सुवर्ण विधान सौध व जिल्हा स्टेडियम येथे कार्यक्रम होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Tags:

belagavi-commissioner-ashok-dudagunti-pressmeet/