अथणी येथे २१ ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून राहुल गांधी आणि सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेत अथणी मतदार संघातील २५०० हुन अधिक कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती गजानन मंगसुळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारत जोडो पदयात्रेत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ५०० वाहनांची व्यवस्थाही करण्यात येत असून हजारो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एआयसीसी अध्यक्षपदी खर्गे यांची नियुक्ती झाल्याबद्दल तसेच बीसीसीआय अध्यक्षपदी रोजर बेन्नी यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
स्वातंत्र्यानंतर विखुरलेल्या जनतेला एकत्रित आणण्यासाठी भारत जोडो पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून आतापर्यंत या पदयात्रेच्या ३५७३ किलोमीटरचा पल्ला गाठला आहे. संपूर्ण विश्वात विविधतेने नटलेल्या भारताला भाजपकडून तडा गेला. समानता, बेरोजगारी, दरवाढ, सामाजिक न्याय या सर्व मुद्द्यावर सरकार भरकटले असून याविरोधात पदयात्रा आयोजित करून जनजागृती करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बसवराज बुटाळी, अस्लम नालबंद, श्रीकांत पुजारी, शिवू गुंडापुर, सत्यव्वा बाग्यन्नावर, के पी सी सी सदस्य चिदानंद मुकनी, सय्यद आमीन गद्याळ, विलीन यळमल्ले, रियाज सनदी, बसवराज हळ्ळदमळ, सय्यद गड्डेकर, रमेश पवार, रवी बडकंबी आदी उपस्थित होते.


Recent Comments