कारदगा ग्रामपंचायत मध्ये विरोधी पक्षातील काही सदस्य सत्ताधारी पक्षाकडून मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या विकास कामांना अडचणी निर्माण करत आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील सर्व सदस्यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

विरोधी पक्षांच्या अडवणुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ कारदगा ग्रामपंचायतच्या सत्ताधारी पक्षातील सर्व सदस्यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्या सौ. सुमित्रा उगळे, कारदगा ग्रामपंचायत अध्यक्ष राजु खिचडे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष सौ. मंगल डांगे, सौ. रशिदा पटेल, सौ. विरश्री खिचडे, सौ. स्वाती कांबळे, सौ. पद्मा अलंकार, सौ. दळवाई, सौ. संगिता सोहम खोत, सदस्य सुदिप उगळे, सुभाष ठकाने, किरणकुमार टाकळे, निवदुत धनगर, राहुल रत्नाकर, विनोद ढेंगे, संजय गावडे,ज्योती अलंकार, सचिन जाधव, रणजित हंडे, सुदीप कांबळे, लक्ष्मण माने, धोंडीराम काशीद, विजय कचरे, महादेव डांगे, प्रतिक कांबळे, पांडुरंग वड्डर, ईश्वर कुरणे, संभाजी कांबळे, रवी कांबळे, आनंदा चव्हाण, धोंडीराम काशीद, सुरेश आळते व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments