Yadgiri

राहुल गांधी भविष्यातही प्रधानमंत्री होणार नाहीत : मुख्यमंत्र्यांची भविष्यवाणी

Share

राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान नाहीत आणि भविष्यातही ते प्रधानमंत्री होणार नाहीत असा ठाम विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केलाय.

यादगिरी येथील हुनसगी येथे जनसंकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनसंकल्प यात्रेचे उदघाटन करून मुख्यमंत्री बोलत होते. राहुल गांधी यांना आमच्या विकासकामांची काहीच माहिती नाही. आणि काँग्रेसच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची त्यांना माहितीही नाही. आता सिध्दरामय्यांच्या काळातील भ्रष्टाचाराची फाईल मी पाठवतो यावर काही कारवाई करता येईल का? असा मिश्किल सवालही त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेस जनतेच्या ऋणात आहे आणि ते ऋण आम्ही फेडण्याचे काम आम्ही करत असल्याचे ते म्हणाले. मागासवर्गाच्या नावावर राजकारण झाले पण विकास झाला नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. न्यायमूर्ती डॉ. नागमोहन दास यांच्या अहवालाची अंमलबजावणी करून आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. स्वावलंबी आणि स्वाभिमानाचे जीवन देण्यासाठी आम्ही आरक्षण वाढवले आहे सामाजिक न्यायावरून आम्ही केवळ भाषणबाजी करत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

कलम ३७१ – जे हे सहजासहजी आले नाही, जर हे कलम लागू करण्यात आले नसते तर काँग्रेसला फिरणेही कठीण झाले असते. अनुदान न देताच हे कलाम लागू करून काय उपयोग? येडियुरप्पांनी १४०० कोटींचे अनुदान दिले त्यानंतर आपण ३००० कोटींचा कृती आराखडा तयार केला. काँग्रेसने अनुदान जाहीर केले पण ते कधीच दिले नाही, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.

आपले सरकार सत्तेवर आल्यापासून २ हजार शाळा खोल्या बांधण्यात आल्या. कृष्णा सिंचन प्रकल्पासाठी ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून काँग्रेस सरकारच्या काळात या कोणत्याही गोष्टी झाल्या नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ज्या काँग्रेस सरकारच्या काळात अनेक भ्रष्टाचार झाले त्यांनी पीएसआय भरती भ्रष्टाचाराबाबत बोलू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी मंत्री बी श्रीरामलू, भैरती बसवराज, गोविंद कारजोळ, मुरुगेश निरानि, आमदार राजूगौड आदींसह भाजप नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: