Crime

50 हजारांची लाच घेताना डीआयसी सहसंचालक जाळ्यात

Share

सबसिडी मंजुरीचे पत्र देण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना बेळगावच्या जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक आणि सहाय्यक संचालकांना लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. सहसंचालक आर. एच. शिवपुत्रप्पा आणि सहाय्यक संचालक पद्मकांत जी. अशी त्यांची नावे आहेत.

जिल्हा उद्योग केंद्राच्या एका योजनेचे लाभार्थी गिरीश कुलकर्णी यांना 50 हजारांची सबसिडी मिळणार होती. त्यासाठी लागणारा आदेश-मंजुरीपत्र देण्यासाठी या दोघा अधिकाऱ्यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर कुलकर्णी यांनी लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार केली होती.

त्यानुसार बेळगावच्या लोकायुक्त पोलीस अधीक्षक यशोदा वंटगुडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून आज लाचेची रक्कम स्वीकारताना या दोन अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बेळगाव लोकायुक्त पोलीस करत आहेत. या कारवाईने सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Tags: