बेळगावात ‘हाय-टेक मोटर्स आणि ऑटोमोबाईल्स’ने दिवाळीसाठी खास “हाय-टेक कार्निव्हल” मेगा लोन मेळा आणि एक्सचेंज मेळा आयोजित केला आहे. त्याचे आज शानदार समारंभात उदघाटन करण्यात आले.
होय, हायटेक मोटर्स कंपनीने बेळगाव उत्तर कर्नाटकात वाहन विक्रीच्या क्षेत्रात चांगले नाव कमावले आहे. ग्राहकांना विश्वासार्ह सेवा देण्यासाठी हे आस्थापन प्रसिद्ध आहे. सणासुदीच्या निमित्ताने त्यांच्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी बेळगाव शहरातील किल्ला तलावासमोर समोर भव्य मेगा कर्जमेळा व एक्सचेंज ऑफर आजपासून तीन दिवस सुरु झाली आहे.

बेळगावचे प्रसिद्ध डॉक्टर सोनवलकर यांच्या हस्ते भव्य मेगा कर्जमेळा व एक्सचेंज ऑफर मेळाव्याचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे डॉ. सोनवलकर आणि मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार म्हणाले की, टीव्हीएस कंपनी ही देशातील प्रसिद्ध कंपनी आहे. बेळगावची हायटेक टीव्हीएस मोटर्स गेली अनेक वर्षे वाहनांसह ग्राहकांना चांगली सेवा देत आहे. आगामी उत्सवासाठी खरेदी करण्यासाठी टीव्हीएस कंपनीची विविध डिझाईन्सची आकर्षक वाहने येथे उपलब्ध आहेत. येथे एकदा भेट द्या आणि तुमचे आवडते वाहन स्वतःचे बनवा.
संचालक राजेश भोसगी आणि राजेंद्र देसाई म्हणाले की, विशेषत: दिवाळीसाठी खासकरून टीव्हीएस मॉडेल्सची सर्व वाहने येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. वाहनांची एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. त्याचा सदुपयोग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
नंतर विनय बाळीकाई यांनी या कर्जमेळा आणि प्रदर्शनाविषयी अधिक माहिती इन न्यूज-आपली मराठीला अधिक दिली.या तीन दिवसीय कर्ज मेळाव्याला आणि प्रदर्शनाला आजच भेट द्या आणि दिवाळीनिमित्त तुमचे आवडते वाहन घरी घेऊन जा.


Recent Comments