Belagavi

बेळगाव मनपाकडून गोवावेसजवळ अतिक्रमण हटावो ! रहिवाशांचा तीव्र विरोध

Share

बेळगाव महानगरपालिकेने आज सकाळी-सकाळीच गोवावेस सर्कलमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. घर रिकामे करू न दिल्याने संतप्त रहिवाशांनी, ‘आधी आमच्यावर जेसीबी चालवा मग आमची घरे पाडा’ म्हणत या मोहिमेला तीव्र विरोध केला. एवढेच नाही तर सत्ताधारी भाजप सरकार मुस्लिमांच्या विरोधात आहे असा आक्रोश करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

होय, बुधवारी पहाटे गोवावेस सर्कलमध्ये जेसीबीचा कर्णकर्कश आवाज दणाणला. पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण केल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत घरे पाडण्याची कारवाई सुरू केल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी घरासमोर बसून धरणे आंदोलन केले. कोणत्याही परिस्थितीत आमचे घर पाडू दिले जाणार नाही, असे महिलांनी ठणकावून सांगितले. यावेळी पोलिस आणि रहिवाशांमध्ये बाचाबाचीही झाली. भाजप सरकार मुस्लिमांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत रहिवाशांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.


या दरम्यान, आंदोलन करणाऱ्या एकाला शहापूर पोलिसांनी अटक केली. येथील रहिवाशांच्या विरोधाला न जुमानता पाचहून अधिक घरे, एक गॅरेज आणि गुजरीचे दुकान पाडण्यात आले. यावेळी बोलताना एका महिलेने, ‘आम्हाला नोटीसही दिली नाही. दादागिरी करून ते आमचे घर पाडत आहेत. सर्व सामान घेतले पाहिजे. इथे आमचे एकच मुस्लिम घर आहे. आम्ही मुस्लिम आहोत म्हणून आम्हाला त्रास देताय का? आम्ही 70 वर्षांपासून याच घरात राहत आहोत. आमची मुले, आम्ही आमच्या घरासमोर झोपतो, आमच्यावर जेसीबी चालवून मगच आमचे घर पाडा. आम्ही फार श्रीमंत नाही. लोकांची भांडी घासून जगतो असा संताप व्यक्त केला. बाइट
सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. बंदोबस्तासाठी तीसहून अधिक पोलिस नेमले आहेत. रहिवाशांच्या तीव्र विरोधाला न जुमानता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दे धडक कारवाई केल्याने ज्यांची घरे गेली आहेत, त्यांच्याकडून संताप व्यक्त होत आहे. आता ते पुढे कशाप्रकारे लढा देणार हे पहावे लागेल.

Tags:

belgaum goaves encroachment