Belagavi

अंजुमन-ए-इस्लाम संघटनेची बेळगावमध्ये धरणे

Share

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी उत्तर कर्नाटक अंजुमन ए इस्लाम या संघटनेच्या वतीने बेळगावात धरणे आंदोलन छेडण्यात आले.

व्हॉइस : उत्तर कर्नाटकातील हज भवनाचे बांधकाम लवकरच सुरू व्हावे, उत्तर कर्नाटक भागासाठी स्वतंत्र वक्फ बोर्ड द्यावा तसेच राज्यातील १ कोटी ५० लाख लोकसंख्या असलेल्या आपल्या समाजाला स्वतंत्र उर्दू विद्यापीठ देण्यात यावे, या आणि अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंजुमन ए इस्लाम या संघटनेच्या वतीने बेळगावमध्ये धरणे आंदोलन छेडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी बागलकोट येथील आरिफ इनामदार यांनी याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले, सरकारदरबारी आपण तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शांततेत धरणे आंदोलन छेडण्यात आले असून हुबळी, धारवाड, विजापूर, बागलकोट, हावेरी, कोप्पळ, रायचूर, बिदर, कलबुर्गी, कारवार, बेळगाव, होस्पेट आणि उत्तर कर्नाटकातील इतर भागातील लोक या धरणे आंदोलनात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. ()

या आंदोलनात उत्तर कर्नाटक अंजुमन ए इस्लामचे अध्यक्ष एच एम कोप्पद, सचिव जे एस हडगली, खजिनदार ए बी अत्तार, पदाधिकारी जे एन गलगली, महम्मद अली पाशा, एम.बी. नालबंद, एम.एम. घिवाले, जावेद पाशा, एम.एम. खाद्री, के.एम. मुचळे, एम.बी. नाशिपुडी आदी सहभागी झाले होते.

Tags:

belgaum anjuman e islam protest