आपल्या देशातील पहिल्या स्वातंत्र्यसैनिक वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांचा इतिहास आपल्या मुलांना सांगणे आवश्यक आहे असे मत हीरा शुगरचे संचालक पवन कत्ती यांनी व्यक्त केले.

कित्तूर उत्सवाचा एक भाग म्हणून राज्यभर काढण्यात येत असलेल्या कित्तूर चन्नम्मा वीर ज्योतीचे आज हुक्केरी तालुका प्रशासनाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
अडवीसिद्धेश्वर मठाच्या प्रांगणात तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांनी विरज्योती रथाचे पूजन केले.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना तहसीलदार हुगार म्हणाले की, कर्नाटक सरकार प्रथमच राज्यस्तरावर कित्तूर उत्सव साजरा करत आहे, आज वीर ज्योतीचे हुक्केरी येथे जल्लोषात स्वागत करून पूजा करण्यात आली
त्यानंतर कुंभमेळ्यासह महिला व बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून वीरज्योतीचे दर्शन घडविले.

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना पवन कत्ती यांनी, राज्यस्तरावर प्रथमच कित्तूर उत्सव सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, कित्तूर उत्सव दरवर्षी भव्य पद्धतीने साजरा केला पाहिजे. कारण कित्तूर राणी चन्नम्मा यांचे शौर्य आणि देशभक्ती आजच्या मुलांना कळणे आवश्यक आहे.
यावेळी नगराध्यक्ष ए. के. पाटील, उपाध्यक्ष आनंद गंध, तापं मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश सिदनाळ, एसीडीपीओ होलेप्पगोळ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मोहन जाधव, बीईओ मोहन दंडिन, महावीर निलजगी, उदय हुक्केरी व नगरपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments