खानापूर तालुक्यातील नंदगड ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत गेल्या ५ दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाला असून संतप्त ग्रामस्थांनी ग्राम पंचायत कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केले.

खानापूर तालुक्यातील नंदगड या गावात गेल्या पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. हेस्कॉमचे बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून यावर संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी ग्राम पंचायत कार्यालयाला घेराव घालत निषेध व्यक्त केला.
ग्राम पंचायत उपाध्यक्ष मन्सूर तहसीलदार यांच्यासह १९ सदस्यांनी, हेस्कॉमने बिल न भरल्याने गावातील पथदिव्यांचे कनेक्शन बंद केले असल्याचे सांगितले. अध्यक्षांनी धनादेशावर स्वाक्षरी केली नाही. याबाबत तालुका पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली होती. मात्र त्यांनीही योग्य प्रतिसाद दिला नसल्याची तक्रार करत संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत आवारात एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले.(फ्लो)
अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या उपस्थितीत धनादेश काढण्याची तयारी सुरु झाली मात्र याचवेळी उपाध्यक्षांनी आक्षेप घेत धनादेश देण्यासाठी उपाध्यक्षांची गरज नसल्याचे सांगत आपण गावच्या हितासाठी कोणतेही सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले
यावेळी काँग्रेस नेते महांतेश कल्याणी यांनी ग्रामस्थांची बाजू उचलून धरत घडल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभारामुळे ग्रामस्थांना शिक्षा मिळत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी ग्राम पंचायतीच्या १९ सदस्यांनीही ग्रामस्थांसमवेत पंचायत कार्यालयाला घेराव घातल्याचे दिसून आले. ग्राम पंचायत सदस्य संदीप पारिश्वाडकर, नागू पाटील, लक्ष्मण जांबोटकर, शफी खाजी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.


Recent Comments