Belagavi

कुरबर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा : विनायक कट्टिकार

Share

हालुमत कुरबर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात यावा, अशी मागणी या समाजाचे नेते विनायक कट्टिकार यांनी केली.

: मंगळवारी बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अनुसूचित जाती आणि जमातींना वाढीव आरक्षण जाहीर केले असून सदर निर्णय हा स्वागतार्ह असल्याचे ते म्हणाले. कुरुबर समाज ब्रिटिशांच्या काळापासून अनुसूचित जमातीत मोडला जातो.

मात्र सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केली नसून आपल्या समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यात यावा, अन्यथा भविष्यात यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
या पत्रकार परिषदेस शंकर हेगडे, मारुती मोडी, मनोहर मिसाळे, कृष्णा कलबुर्गी आदींसह कुरबर समाज बांधव उपस्थित होते.

Tags: