Belagavi

अरुणसिंहांवर भडकले बसवजय मृत्युंजय स्वामीजी !

Share

अरुणसिंह यांना कर्नाटकबद्दल माहिती नाही. अरुण सिंह यांनी विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ याना हलके समजू नये, त्यांच्या विरोधात कोणत्याही कारणास्तव हलके बोलू नका, असा इशारा देण्याची मागणी कुडलसंगम पंचमसाली पीठाचे श्री. बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी केली आहे.

‘यत्नाळ हे आमचे नेते नाहीत’, या भाजपचे प्रदेश प्रभारी अरुणसिंह यांच्या वक्तव्यावरून गरम झालेले बसवजय मृत्युंजय स्वामीजी प्रसार माध्यमांच्या याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, बसनगौडा पाटील यत्नाळ हे कर्नाटकातील जनतेचे नेता आहेत किंवा नाहीत, याचे उत्तर आपण हुक्केरी येथील पंचमसाली परिषदेत देणार आहोत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी यत्नाळ यांच्यासह पंचमसाली समाजाच्या नेत्यांबाबत अपमानास्पद वक्तव्ये करू नयेत, अशा सूचना द्याव्यात, अशी मागणी बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी केली

पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षणाच्या मागणीसाठी हुक्केरी येथे 21 ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय लिंगायत पंचमसाली महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हुक्केरी येथे होणार्‍या पंचमसाली अधिवेशनात आरक्षणासाठी सरकारविरोधातील संघर्षाची रूपरेषा तयार करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 25 लाख पंचमसाली समाजबांधवांनी विधानसौधसमोर येऊन सरकारवर दबाव टाकून ताकद दाखविण्याची गरज आहे असे ते म्हणाले

दरम्यान, स्वामीजींनी हुक्केरी येथे 21 तारखेला होणाऱ्या भव्य पंचमसाली संमेलनाची निमंत्रणे जारी केली. यावेळी माजी मंत्री शशिकांत नाईक, आर.के.पाटील, दिनेश पाटील, गुंडू पाटील, हणमंत कोंगाळी, बी. आय. पाटील, राजू मगदुम, रुद्रण्णा चंदरगी आदी उपस्थित होते.

Tags: