Bidar

औराद येथे जनसंकल्प यात्रेचे उद्घाटन

Share

कर्नाटक एक आहे आणि संपूर्ण कर्नाटकाचा समग्र विकास हा सरकारचा उद्देश आहे, विकासकामात सरकार कोणताही भेदभाव करत नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले.

: बिदर जिल्ह्यातील औराद येथे आज भाजप जनसंकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जनसंकल्प यात्रेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, जिथे गरज असेल तिथे विकासासाठी आम्ही तयार आहोत. बीदर जिल्ह्यातील औराद आणि भालकी विधानसभा मतदारसंघातील तलाव भरण्याच्या प्रकल्पासाठी आम्ही अनुदान दिले आहे.

विकासाच्या बाबतीत प्रादेशिक असमतोल नसावा, दरडोई उत्पन्न समान असावे, बेंगळुरू आणि बिदरमध्ये दरडोई उत्पन्नात समानता आणायची असेल तर बिदरचा सर्व आघाड्यांवर विकास झाला पाहिजे आणि हेच आमचे ध्येय आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

यावेळी बिदर जिल्हा पालकमंत्री शंकरपाटील मुनेनकोप्प, केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, पशु संगोपन विभाग मंत्री प्रभू चव्हाण, जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ, मराठा समाज विकास महामंडळाचे अध्यक्ष मारुतीराव मुळे यांच्यासह हजारो भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

Tags: