यंग बेळगाव फाउंडेशन आणि रोटरॅक्ट क्लब युवादर्पण यांच्या वतीने बेळगावात आज स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
हनुमाननगर बसस्थानक व परिसरात स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या यंग बेळगाव फाउंडेशन आणि रोटरॅक्ट क्लब युवादर्पण यांच्या युवा कार्यकर्त्यांनी बसस्थानकाची स्वच्छता करून त्याला नवे रूप दिले. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला साचलेला कचराही त्यांनी गोळा केला.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते ऍलन विजय मोरे म्हणाले की, आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तसेच रस्त्याच्या कडेला कचराकुंड्या ठेवाव्यात. तसेच महानगरपालिकेने बसथांब्यांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शुभम चौगले, नमिता राजपूत, अरविंद तडसाड, देव जैन, प्रथमेश जोशी, हुजी एस, संकल्प पाटील, प्रणव बेळगावकर, अद्वैत चव्हाण-पाटील, अमेश डी, ओमी बी, खुशी पाटील, कार्तिक, अनिकेत, आदित्य गावडे, जय.एस., संदीप सोमनट्टी, नितीन कोठारी आदींचा या स्वच्छता उपक्रमात सहभाग होता.


Recent Comments