Banglore

प्रधानमंत्री किसान सन्मान संमेलनाला मुख्यमंत्री व्हर्च्युअली उपस्थिती

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान संमेलनाचे उदघाटन दिल्ली येथे पार पडले. यावेळी थेट लाभ हस्तांतरण आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजना निधीचा १२ वा हप्ता जारी करण्यात आला.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत योजना निधीचा १२वा हप्ता जारी करण्यात आला. यामाध्यमातून सुमारे ८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १६ कोटी रुपये जमा करण्यात आले. यावेळी व्हर्च्युअल माध्यमातून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उपस्थिती दर्शविली.

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्रिमंडळ सदस्य, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि सर्व जिल्हाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. . या योजनेंतर्गत राज्यातील ५० .३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १००७.२६ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यातून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. युरियासारख्या अत्यावश्यक खतांसाठी सरकार अनुदान देत असून या वर्षी अडीच लाख कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे, देशाने कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची गरज असल्याचे मत यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केले.

Tags:

pradhanmantri kisan samman