मंड्या जिल्ह्यातील मळवळ्ळी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर ट्युशनमधील शिक्षकाने केलेल्या अमानुष अत्याचाराप्रकरणी आरोपीला कडक शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी आज कर्नाटक भीमसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मंड्या जिल्ह्यातील मळवळ्ळी परिसरात एईएस गल्लीतील १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर ट्युशन सेंटरमधील नराधम शिक्षकाने चॉकलेटचे आमिष दाखवून अमानुष अत्याचार करून तिचा खून केला. या घटनेचा राज्यभरात तीव्र निषेध केला जात असून आरोपी कांतराजू या नराधमाला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत कर्नाटक भीमसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंड्या जिल्ह्याच्या पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे निवेदन सादर केले.
यावेळी कर्नाटक भीमसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत हे अमानवी कृत्य असून समाजातील अशा विकृतींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
यावेळी कर्नाटक भीमसेना जिल्हाध्यक्ष सुभाष मादर, जिल्हा मानद अध्यक्ष प्रवीण मादर आदींसह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments