काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी आज देशभरात मतदान घेण्यात आलं. अध्यक्षपदासाठी बेंगळूर येथील केपीसीसी कार्यालयात मतदान पार पडले. यावेळी बेळगावचे माजी आमदार फिरोज सेठ आणि परशुराम वग्गन्नावर यांनी मतदानाचा हक्क बजावला.
होय, तब्बस 24 वर्षांनंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेसच्या जवळपास 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली जात आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर यांच्यात लढत होत आहे.
देशभरातील नऊ हजारांपेक्षा अधिक प्रदेश काँग्रेस समित्यांचे प्रतिनिधी गुप्त मतदान पद्धतीद्वारे पक्षाध्यक्षाची निवड करणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात आणि देशभरातील 65 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. बेंगळूर येथील केपीसीसी कार्यालयात स्थापन केलेल्या मतदान केंद्रात केपीसीसी सदस्य बेळगावचे माजी आमदार फिरोज सेठ आणि परशुराम वग्गन्नावर यांनी मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी त्यांच्यासमवेत बेळगाव महानगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजू सेठदेखील उपस्थित होते. या निवडणुकीचा निकाल उद्या, बुधवारी जाहीर होणार आहे.


Recent Comments