महापालिकेच्या अधिकार्यांच्या बेजबाबदारपणामुळे भरदिवसा विनाकारण पथदीप पेटत असल्याचे दृश्य बेळगावातील भाग्य नगरमध्ये पाहायला मिळाले आहे.
बेळगावमधील भाग्यनगर येथील 7, 8 आणि 9 व्या क्रॉस परिसरात दिवसा पथदिवे जळत आहेत. येथील रहिवासी दीपक अवरसेकर यांनी ही बाब हेस्कॉम अभियंत्यांसह संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अशाप्रकारे जनतेच्या कराच्या पैशांचा दुरुपयोग करणार्या मनपाच्या अधिकार्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अनेक भागात वीजेविना लोक जगत असताना बेळगावात नाहक वीज वाया घालविण्याचा या प्रकाराचा नागरिकांनी निषेध केला आहे. संबंधितांनी तातडीने जागे होऊन ही चूक दुरुस्त करावी अशी मागणी करण्यात येत आहे.


Recent Comments