Crime

दोन कोवळ्या प्रेमी जीवांच्या प्रेमप्रकरणाचा दुःखद अंत

Share

त्या दोघांचे मागील एक वर्षापासून प्रेम होते. त्यांच्या प्रेमकहाणीला बसमध्ये प्रारंभ झाला. त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती झाल्यावर पालकांनी त्यांना अनेकवेळा समजावले पण त्यांनी ऐकले नाही, त्यानंतर मात्र या प्रेमीयुगुलाचा अचानक दुर्दैवी अंत झाला. याबाबत सादर आहे हा संपूर्ण वृत्तांत.

होय, विजापूर जिल्ह्यातील एका प्रेम प्रकरणाचा दुःखद अंत झाला आहे. होय, जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील घोनसागी गावातील मल्लिकार्जुन जमखंडी आणि कळ्ळकवटगी गावातील अल्पवयीन मुलगी यांच्यामध्ये प्रेमांकुर फुलला होता. विजापूरला कॉलेजमध्ये रोज एकाच बसमध्ये येण्यापासून सुरू झालेले त्यांचे प्रेमप्रकरण उद्याने आणि मंदिरांमध्ये फिरण्यापर्यंत पोहोचले. दोघांच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यांनी त्यांची समजून काढली.

मल्लिकार्जुन या तरुणाला जमखंडी येथील लष्करी प्रशिक्षण शाळेत ठेवण्यात आले होते, परंतु 22 सप्टेंबरच्या रात्री प्रेयसीने मल्लिकार्जुनला बोलावले. तिचे बोलणे ऐकून मल्लिकार्जुन जमखंडी तिच्या मागे गेला, दोघेही एका खोलीत बसलेले असताना मुलीचे वडील गुरप्पा यांनी त्यांना पकडले, वडिलांनी समजावून सांगूनही त्या अल्पवयीन मुलीने त्यांचे न ऐकता अचानक विष प्याले आणि तिचा तत्काळ मृत्यू झाला. आपल्या मुलीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या वडिलांनी तिचा प्रियकर मल्लिकार्जुनला विष पाजले. त्यामुळे तोसुद्धा मरण पावला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी दोघांना वेगवेगळ्या पोत्यात बांधून कृष्णा नदीत फेकून दिले.

त्यानंतर त्यांनी तिकोटा पोलिस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या दरम्यान, मल्लिकार्जुन जमखंडी यांच्या कुटुंबीयांनीही मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी बागलकोट जिल्ह्यातील बिळगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पोत्यात एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावरील कपड्याच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह मल्लिकार्जुन जमखंडी यांचा असल्याचे आढळून आले. या प्रकरणात अल्पवयीन मुलीचे वडील गुरप्पा हेच खलनायक असल्याचे तपासाला सुरुवात करणाऱ्या पोलिसांना समजले.

मुलीचे वडील गुरप्पा यांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा आणि मल्लिकार्जुनाचे मृतदेह कृष्णा नदीत फेकून दिले. त्यापैकी फक्त एक मृतदेह आतापर्यंत सापडला आहे. पोलीस अद्याप तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. आरोपी गुरप्पा आणि त्याचा साथीदार अजित यांना पोलिसांनी तुरुंगात टाकले आहे. एकूणच, दोन कोवळ्या प्रेमी जीवांच्या प्रेमप्रकरणाचा असा दुःखद अंत झाला ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

Tags: