विजापूर महानगर पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, शहरात दिवसेंदिवस इलेक्शन फीव्हर जोर धरू लागला आहे. संबंधित पक्षांचे इच्छुक उमेदवार बी.फार्मसाठी त्यांच्या-त्यांच्या नेत्यांच्या घरांचे उंबरठे झिजवत आहेत. काही उमेदवारांनी तर जोरदार प्रचारही सुरु केला आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे काही इच्छुकांनी निवडणूक जिंकण्यासाठी चक्क जादूटोणा, तंत्र-मंत्राचा आधार घेतला आहे. अशीच एक घटना उघडकीस आली आहे.
होय, ऐकून आश्चर्यचकित व्हाल, पण हे सत्य आहे. विजापूर मनपा निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने एका उमेदवाराने चक्क जादूटोण्याचा आधार घेतला आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मध्ये भोंदूबाबाच्या मदतीने जादूटोणा करण्यात आलाय. विजापूर शहरामधील शिकारखाना परिसरातील अनंत-लक्ष्मी हॉलजवळ, बदमाशांनी जादूटोणा करून लिंबू, पाने, अंडी, पैसे, फुले आणि इतर साहित्य टाकून दिले आहे. जादूटोण्याच्या या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशीही हैराण झाले आहेत. पोलिसांनी हा जादूटोणा करणाऱ्या लोकांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. काहीही असो, पण निवडणूक जिंकण्याच्या इच्छेने जादूटोणा करणाऱ्या उमेदवारांमुळे भोंदूबाबा आणि तांत्रिक-मांत्रिकाने मात्र चांगले दिवस आले असून त्यांचा मोठा फायदा होत आहे.


Recent Comments