हासन जिल्ह्यातील अरसीकेरे तालुक्यात तिहेरी भीषण रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात 3 मुलांसह 2 महिलांचा समावेश असून अपघातात ते जागीच ठार झाले आहेत. उर्वरित चौघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
50 वर्षीय आजी लीलावती त्यांचे नातू दैव आणि तन्मय यांचा मृत्यू झाला. त्याशिवाय लीलावतींचा दीर दोड्डय्या आणि त्यांची पत्नी भारती यांचाही अपघातात मृत्यू झाला आहे. आई चैत्रा (33) आणि मुले सृष्टी, समर्थ रॉय यांचाही मृत्यू झाला. चैत्रा, सृष्टी, समर्थ हे सर्व दोड्डय्या यांचे बंधू कुमारस्वामी यांची मुले आहेत
ही घटना बानावर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस, टेम्पो ट्रॅव्हलर वाहन आणि टँकर अशा तीन वाहनांमध्ये हा भीषण अपघात झाला. यामध्ये लहान मुलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला
हासन जिल्ह्यातील अरसिकेरे तालुक्यातील बानावर सर्कलमधील गांधीनगर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 69 वर ही भीषण दुर्घटना घडली. टेम्पो ट्रॅव्हलर वाहनातून एकाच कुटुंबातील 14 जण धर्मस्थळला जाऊन घरी परतत होते. दुर्दैवाची बाब म्हणजे घरापासून ते केवळ आणखी पाच-सहा किलोमीटरवर असतानाच घरी पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. चौदा जण टेम्पो ट्रॅव्हलर वाहनातून धर्मस्थळला जाऊन मंजूनाथाचं दर्शन घेऊन नंतर हसनंबे देवीचे दर्शन घेऊन गावाकडे जात होते. गावात पोहोचायला त्यांना अवघी दोन ते तीन मिनिटे लागली.
अरसीकेरे-शिवमोग्गा राष्ट्रीय महामार्ग 206 वर काम सुरु आहे. एक परिवहन बस टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाच्या मागुन येत होती. शिवमोग्गा येथून अरसीकेरेकडे येणारा यमरूपी दुधाचा टॅंकर वळण न घेता दोन वाहनांच्या दिशेने एकदम समोर आला. यावेळी भरधाव वेगात असलेले टेम्पो ट्रॅव्हलर वाहन दुधाच्या टॅंकरला धडकून उलटले. त्याच वाहनाच्या मागे असलेली परिवहन बस उलटलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला धडकली. या अपघातात लीलावती (50), चैत्रा (33), समर्थ (10), डिम्पी (12), तन्मय (10), दैव (2), वंदना (20), दोड्डय्या (60) आणि भारती (50) हे टेम्पो ट्रॅव्हलरमधील नऊ जण जागीच ठार झाले, तर 12 जण गंभीर जखमी झाले.
10 जखमींवर जिल्हा रुग्णालयात, तर दोघांवर अरसीकेरे तालुका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धडकेत टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाचा संपूर्ण चुराडा झाला. अरसीकेरे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून टॅंकर चालक फरार झाला आहे.
Recent Comments