पूर्ववैमनस्यातून एका रौडीशीटरवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना काल रात्री हुबळीतील कमरीपेठ येथे घडली.

हुबळीतील कमरीपेठ परिसरात काल शनिवारी रात्री जीवघेणा थरार लोकांनी अनुभवला. राजू कठारे उर्फ “बंगळुरू राजा” या रौडीशीटरवर काल रात्री जीवघेणा हल्ला करून त्याला संपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. काल रात्री तो आपल्या घरासमोर उभा असताना तो सशस्त्र हल्लेखोर
कांता कठारे याने त्याच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे राजू कठारे गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तो मृत्यूशी झुंज देत आहे.
जुन्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. कांता कठारे आणि राजू कठारे उर्फ “बंगळुरू राजा” यांच्यात अनेक वर्षांपासून वैर होते. त्यातूनच कांता कठारे याने काल रात्री राजू कठारे याच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर कांता कठारे फरार झाला आहे. कमरीपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी सापळा रचला आहे


Recent Comments