नवनवीन डिझाइन्स शोधत राहणाऱ्या ज्वेलरी प्रेमींसाठी ही एक गोड बातमी आहे… जर तुम्ही आधुनिक डिझाईनच्या शोधात असाल तर परदेशात जाण्याऐवजी बेळगावमध्ये आयोजित केलेल्या या प्रदर्शनाला भेट दिलीत तर तुम्हाला नवनवीन दागिन्यांची ओळख करून दिली जाईल… कुठे आहे हे प्रदर्शन?…आणि ते कोणी भरवली? जाणून घ्यायचेय तर मग पहा हा रिपोर्ट.

एक्सक्लुसिव्ह डिझाइन्सचे विविध हिरे, रत्ने, क्रश, पिंक गोल्ड, व्हाईट गोल्ड, सोन्याचे असंख्य दागिने… बापरे एकाहून एक सरस डिझाइन्सचे सुंदर, मनमोहक दागिने ! हे असे कलेक्शन आहे जे पाहून तुम्हाला ते विकत घेण्याचा मोह आवरणारच नाही. होय, तुम्ही पहात असलेली ही दृश्ये बेळगावमध्ये पाहायला मिळतील.
दियानी दीप्ती कोरे-आराध्या यांच्या या ‘द फेस्टिव्ह एडिशन’चे आयोजन आजपासून बेळगाव येथील ‘युके- 27’ हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. परदेशात शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन भारतात आपले कौशल्य दाखवणाऱ्या, आणि केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांची कन्या दीप्ती कोरे-आराध्या यांनी बनवलेल्या नाविन्यपूर्ण दागिन्यांचे प्रदर्शन आज भरवण्यात आले. त्यात विविध प्रकारच्या हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांचा संग्रह ठेवण्यात आला होता.

माझ्या सुनेच्या रक्तातच अनोखी कला आहे. इच्छा असेल तर मार्ग आहे म्हणतात. बेळगावच्या जनतेने तिला प्रोत्साहन द्यावे आणि तिच्या कलेचा विकास व्हावा, अशी इच्छा त्यांच्या सासूबाईंनी व्यक्त केली.
जेमोलॉजिस्ट आणि गोल्ड डिझायनर दीप्ती कोरे-आराध्या यांनी आमच्या ‘इन न्यूज-आपली मराठी’ला सांगितले की, गेल्या 20 वर्षांपासून हे प्रदर्शन आयोजित केले जात आहे. बेळगावकरांना विविध प्रकारचे दागिने आणि डिझाइन्सची ओळख करून देण्याचे काम सुरू आहे. याला बेळगावकरांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्याच्या या प्रदर्शनामध्ये येऊन प्रोत्साहन दिलेल्यांचे दीप्ती यांनी आभार मानले.

दरम्यान, दीप्तीचे सासरे मल्लोक आराध्या यांनी, आपल्या सुनेच्या कामाचा अभिमान व्यक्त केला. दीप्तीने सादर केलेल्या सर्व डिझाईन्स मनमोहक आहेत. तिचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे, असे ते म्हणाले.
हे प्रदर्शन 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु राहणार आहे. तुम्हालाही दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवीन प्रकारचे दागिने खरेदी करायचे असतील तर ‘युके- 27’ मधील ‘द फेस्टिव्ह एडिशन’ला आजच जरूर भेट द्या.


Recent Comments