Belagavi

शेतकरी नेते कल्याणराव मुचळंबी यांची प्रथम पुण्यतिथी

Share

जनकल्याण प्रतिष्ठान बेळगावच्या वतीने शेतकरी नेते दिवंगत कल्याणराव मुचळंबी यांची प्रथम पुण्यतिथी, कथासंग्रहाचे प्रकाशन व पुरस्कार वितरण समारंभ आज बेळगावात पार पडला.

बेळगावातील नेहरुनगरातील बाळेकुंद्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगच्या सभागृहात जनकल्याण प्रतिष्ठान बेळगावच्या वतीने शेतकरी आंदोलक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील अग्रणी नेते व पत्रकार कै.कल्याणराव मुचळंबी यांच्या ‘स्नेहसेतू’ या कथासंग्रहाचे प्रकाशन व कल्याणश्री पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कथा स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी कल्याणराव मुचळंबी हे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध लढा देणारा शेतकऱ्यांचा कणखर आवाज होता. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सरकार बरोबर ते लढले. त्यांनी पत्रकारितेलाही सुरुवात केली आणि हिरवा कंदील घेऊन ते लोकांचा आवाज बनले.

यावेळी हुक्केरी हिरेमठचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी आणि कारंजीमठाचे गुरुसिद्ध स्वामीजी यांनी कल्याणराव मुचळंबी यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याचे सांगितले. धर्म आणि समाजसेवेच्या क्षेत्रातही मुचळंबी यांनी मोठे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

तोंटद येथील डॉ सिद्धराम स्वामीजी आणि हुक्केरी हिरेमठचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या दिव्य उपस्थितीत कार्यक्रम झाला. माजी जिल्हा पालक मंत्री शशिकांत नाईक अध्यक्षस्थानी होते. माजी उपसभापती बी. आर. पाटील, प्रमुख अतिथी म्हणून निर्मला मुचळंबी, लीला कलाकोटी, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
मंगला मेटगुड यांनी कथासंग्रहाचे प्रकाशन केले. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

Tags:

/belgaum-kalyanrao-muchalambi/