Belagavi

भाजपच्या आरोग्य तपासणी शिबिराचा निलजीत समारोप

Share

निलजी येथे भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा समारोप झाला.

भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडळ आणि विजया ग्लोबल हेल्थ केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने निलजी गावात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा समारोप समारंभ आज झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर डॉ. सुनिल यांनी आरोग्याविषयी माहिती दिली.

ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी यावेळी बोलताना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार देशाच्या हितासाठी काम करत आहे. देशाच्या जटील समस्या सोडवून देशाचा विकास करत असल्याचे ते म्हणाले.

माजी आमदार व ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले, केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार जनहिताचे काम करत आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी त्यांनी वैद्यकीय पथकाच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल पाटील होते. भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, दीपा कुडची, युवा मोर्चा अध्यक्ष लिंगराज हिरेमठ, रवी कोटबागी, ​​भरमा गोमान्नाचे, वसंत पाटील, सुनील पाटील, किरण पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शेकडो लोकानी या शिबिराचा लाभ घेतला.

Tags:

belgaum health camp