Banglore

क्रीडा स्पर्धेत हार-जीत महत्त्वाची नाही : सकारात्मक खेळणे महत्त्वाचे : बोम्मई

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बंगळुरू येथे 61 व्या राष्ट्रीय खुल्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शानदार समारंभात उद्घाटन केले.

होय, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज शनिवारी बंगळुर येथे आयोजित केलेल्या 61 व्या राष्ट्रीय खुल्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध राज्यातून आलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी मंचावरील मान्यवरांनी भगवे हिरवे व पांढरे फुगे सोडून कार्यक्रमाची सुरुवात केली.

क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, विद्यार्थी दशेतच खेळाडू खेळात पुढे जाऊ शकतात. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. यासाठी शिस्तबद्ध जीवन अत्यंत आवश्यक आहे. खेळ आपल्या जीवनातील अनेक गोष्टी सांगत असतो. खेळ मैत्री, दुसऱ्याच्या विजयाचा आदर आणि स्पर्धात्मक भावना शिकवतात असे ते म्हणाले.

पुढे बोलताना बोम्मई म्हणाले की, कर्नाटकात खेळांना खूप महत्त्व दिले जाते. राज्यात यापूर्वीच 71 खेळाडूंना दत्तक घेण्यात आले आहे. त्यांना प्रशिक्षणही दिले जात आहे. यावर्षीपासून आम्ही ग्रामीण क्रीडा स्पर्धाही सुरू केल्या आहेत. हा उपक्रम गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर राबवला जात आहे. सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

खेलो इंडियाही तसाच कार्यक्रम आहे. तुम्ही खेळलात तरच जिंकता येईल. तुम्ही खेळला नाही तर जिंकणार कसे, असा प्रश्न करून, आम्ही फिट इंडियाची ओळख करून दिली. आपला देश आधीच ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकत आहे आणि आगामी काळात आणखी पदके जिंकण्याचे आमचे ध्येय आहे. खेळाच्या बाबतीत बंगळुरू खूप चांगले आहे. सर्व खेळाडू खूप चांगले खेळतात. येथील हवामान चांगले आहे. तुम्ही नेहमी सकारात्मक भूमिकेतून खेळले पाहिजे असे बोम्मई म्हणाले.

Tags:

participating-is-important-in-sports-than-winning-or-losing-cm-bommai