कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेल्या प्रसन्न भालचंद्र वराळे यांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आज पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेले प्रसन्न भालचंद्र वराळे हे बेळगाव जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, ही जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यामुळे निपाणी परिसरात आनंदाचे वातावरण आहे.


Recent Comments