बेळगावच्या “एम स्टाईल डान्स अँड फिटनेस अकादमी”च्या विद्यार्थ्यांची इंडियाज इंटरनॅशनल डान्स चॅम्पिअनशिप (आयआयजीएफ) बॅंकॉंक-2022 या जागतिक नृत्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
येत्या 30 ऑक्टोबरला होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील विविध देशांतील हजारो डान्सर भाग घेणार आहेत. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ही निवड झाली असून, खूप अटीतटीचा सामना होणार आहे. या स्पर्धेसाठी बेळगावच्या “एम स्टाईल डान्स अँड फिटनेस अकादमी”चे विध्यार्थी प्रेरणा गोणबरे, पार्थ गोणबरे, वैष्णवी माळगी, माही माळगी, सेजल खंदाळे, प्रथमेश मिसाळ, महर्षी शेखन्नावर, अस्मिता कळ्ळीमनी, सान्वी मुंगारे, कृतिका गावडे, संजना चव्हाण यांची निवड झाली आहे.
यापूर्वी 2018 ते 2021 पर्यंत एम स्टाईल अकादमीच्या विद्यार्थ्यांनी स्पेन, दुबई, बँकॉक, अमेरिका येथे झालेल्या जागतिक नृत्य स्पर्धेत भाग घेऊन सुवर्णपदके पटकावत बेळगावचे नाव उंचावले आहे. त्यांना नृत्य प्रशिक्षक महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


Recent Comments