केएलईचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह विविध मान्यवरांचे सांबरा विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न दलित संघटनांकडून करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांचे सांबरा विमानतळावर आगमन होताच बैलहोंगलचे डीएसपी शिवानंद कटगी यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी दलित संघटनांनी धरणे धरण्याचा प्रयत्न केला. खबरदारीचा उपाय म्हणून दलित संघटनेच्या 10 हून अधिक नेत्यांना मारिहाळ पोलिसांनी ताब्यात घेतले.


Recent Comments