Banglore

भाजपची संकल्प यात्रा विजयसंकल्प यात्रा ठरेल : मुख्यमंत्री बोम्मई

Share

भाजपच्या संकल्प यात्रेला लोकांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे संकल्प यात्रा ही विजयसंकल्प यात्रा होईल यात शंका नाही असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बंगळुरूमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आम्ही 4 जिल्ह्यांमध्ये तीन दिवस यात्रा सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील 2 मतदारसंघात ही मोहीम राबवली जात असून त्याला लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास आहे. जन संकल्प यात्रा ही विजय संकल्प यात्रा ठरेल. 2023 च्या निवडणुकीत आम्ही 150 जागा जिंकू असा आम्हाला विश्वास आहे.

काँग्रेसच्या बेळ्ळारीतील भारत जोडो मेळाव्याबाबत बोलताना बोम्मई म्हणाले की, काँग्रेसच्या सोनिया गांधी मतदारसंघ बदलत आहेत. त्यांना प्रतिज्ञाही वाचता येत नाही.. 3000 कोटींचे पॅकेज जाहीर करणाऱ्या काँग्रेसने आपले आश्वासन पूर्ण केले नाही.

कोणता चेहरा घेऊन तिकडे यात्रा करताहेत, अशी विचारणा केली. काँग्रेसने जनतेची फसवणूक केली आहे. भारत जोडो म्हणजे काय? भारत आधीच एकसंध आहे. तो जोडण्याची गरज नाही. भारत आता सर्वच क्षेत्रात समृद्ध आहे असे बोम्मई म्हणाले. बाईट
राहुल गांधी हे क्षेपणास्त्र निकामी झाले आणि आता ते पुन्हा तेच उडवत आहेत. 4 किलोमीटर चालून दाखवा या सिद्धरामय्या यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देव त्यांना चांगले आयुरारोग्य देवो असे बोम्मई म्हणाले.

मुरुघाश्री यांच्याबाबत भाविकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सरकार कायद्यानुसार कार्यवाही करेल असे बोम्मई यांनी सांगितले.

Tags:

cm-bommai-2