विजापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला आक्षेप घेणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. सुधारित प्रभाग पुनर्र्चनेला या याचिकेत आक्षेप घेऊन स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
विजापूर मनपा निवडणुकीला आक्षेप घेणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपीठात दाखल करून घेऊन त्यावर सुनावणी पूर्ण केली आहे. त्यावरचा निकाल उद्यापर्यंत राखून ठेवला आहे. आज सायंकाळपर्यंत हा निकाल येण्याची शक्यता आहे.
विजापूर मनपामध्ये 35 सदस्य आहेत. याचिकेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होणार का स्थगिती मिळून पुन्हा लांबणीवर पडणार याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. याच महिन्याच्या 28 तारखले निवडणूक घोषित झाली आहे. त्यानुसार, निवडणूक आयोगाने वेळापत्रकही जारी केले आहे.
विजापूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याराणी तुंगळ, दीपा कुंबार, माजी नगरसेवक मैनुद्दीन बिळगी, इद्रास बक्षी यांनी ही याचिका दाखल केली आहे. प्रभाग पुनर्र्चना अवैज्ञानिक पद्धतीने केल्याचा आणि महिलांना 50% आरक्षण दिले नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. 26 प्रभागाचे आरक्षण बदल आणि इतर कारणांचा उल्लेख करून त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. बेंगळूरचे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ के. दिवाकर, एम. ए. दखनी आणि एस. एस. ममदापुर त्यांच्याबाजूने युक्तिवाद करीत आहेत. निवडणूक आयोग आणि विजापूर मनपाच्या वतीने ऍड. अमरेश रुझा बाजू मांडत आहेत. आज याचिकेवर उच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे.


Recent Comments