हुक्केरी तालुका हा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे असे उद्गार हुक्केरी विद्युत सहकारी संघाचे संचालक पृथ्वी कत्ती यांनी काढले. ते आज हुक्केरी शहरातील गजबरवाडी गजबरसाब उरूस कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर बोलत होते.


हुक्केरीत दरवर्षी प्रमाणे गजबरवाडी येथील मुजावर समाजातर्फे उरुसाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. दोन दिवसीय कार्यक्रमात गोवा,महाराष्ट्र,कर्नाटक येथून हिंदू मुस्लिम भाविक येऊन उत्सव साजरा करतात. हुक्केरी शहरात उरुस कार्यक्रमात रात्री नामवंत कलाकारांकडून कव्वालीचे सादरीकरण करण्यात आले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वी कत्ती म्हणाले की, हुक्केरी तालुक्यात हिंदू मुस्लिम बांधव आपल्या वडीलधाऱ्यांनी घालून दिलेले नियम पाळत आले आहेत, कोणताही जातिभेद न ठेवता, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची परंपरा आपण सुरू ठेवली आहे.

नगरपालिका सदस्य फरीदा मुल्ला यांनी सांगितले की, उरूस कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पालिकेने मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
यावेळी जमात सदस्य मलिक मुजावर, राजू मुजावर, अंजुम मुजावर, अल्लाबक्ष मकानदार, नाशीर मुजावर, दस्तगीर मुजावर, आलम मकानदार, सरताज मुजावर, शाबुद्दीन मुजावर, मेहबुब मुजावर, गजबर मकानदार आदी उपस्थित होते.
समिती सदस्यांनी उरूस कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेणाऱ्या तरुणांचे अभिनंदन केले.


Recent Comments