इस्लाममध्ये हिजाब अनिवार्य नाही. कुराणमध्येही तसा उल्लेख नाही, असे माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी म्हटले आहे.
विजापूर येथे आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री ईश्वरप्पा म्हणाले, कर्नाटक उच्च न्यायालयाने याबाबत योग्य निकाल दिला आहे. त्याचवेळी मुस्लिम नेत्यांनी त्या सहा मुलींना समजावून सांगितले असते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. सध्या द्विसदस्यीय खंडपीठाने वेगवेगळे मत दिले असून, त्यावर शंका घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. समानतेला, संविधानाला मान दिला पाहिजे. मोठ्या खंडपीठाचा न्यायाधीशांचा निकाल काय लागतो हे पाहावे लागेल असे ते म्हणाले.
तसेच सहा मुलींना समजावून सांगितले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. आग लावण्याच्या कामामुळे येथे ही परिस्थिती आल्याचे ईश्वरप्पा यांनी सांगितले. बाइट के. एस. ईश्वरप्पा


Recent Comments