Vijayapura

विजापुरात भूकंपाने पुन्हा भरवली धडकी !

Share

घुमटनगरी विजापुरात पुन्हा भूकंपाने धडकी भरवली आहे. वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे जनता हैराण झाली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री ११.४२ आणि आज सकाळी ६.१९ वाजता विजापूर शहरातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. एका रात्रीत दोनदा पृथ्वी हादरली. शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, रंभापूर परिसर, बसवेश्वर नगर, गोलघुमट परिसर आदी अनेक ठिकाणी भूकंपसह धक्के जाणवले. त्यामुळे रात्री आणि सकाळीही लोक घाबरलेले दिसून आले. वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे जिल्ह्यातील जनतेला शांतता नाही.

Tags: