Belagavi

सानीकोप्पजवळ प्रवाहात बुडणारा तरुण सुदैवाने बचावला..!

Share

वाहत्या नाल्यात बुडणाऱ्या तरुणाचा सुदैवानेच जीव वाचल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील सानीकोप्प गावाजवळ घडली.

होय, बैलहोंगल तालुक्यात परतीच्या पावसाने खरोखरच मोठा धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ओढे-नाले ओसंडून वाहत असून, शेतात पाणी साचले असून. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेली पिके वाहून जात आहेत. सानीकोप्पजवळील नाला तुडुंब भरून वाहत असून एका तरुणाने आगाऊपणाने तो ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो नाल्यात दुचाकीसह वाहून जाऊ लागला. तेथील स्थानिक लोकांनाही न विचारता हा तरुण दुचाकीवरूनच नाला ओलांडण्याच्या तयारीत होता. सुदैवाने तो तरुण झाडाझुडुपांना धरून उठला आणि जीव वाचवून निसटला. मात्र त्याची दुचाकी पाण्यात वाहून गेली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

https://youtu.be/95K-iLUsfiU

ओसंडून भरून वाहणाऱ्या नाल्यातून वाहून जाताजाता सुदैवाने बचावलेल्या तरुणाचे नाव पुट्टेश बसप्पा जडेयन्नवर, वय 24 असे असून तो बैलहोंगल तालुक्यातील सिद्धसमुद्र गावातील रहिवासी आहे. ही घटना बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने कोणीही ओसंडून वाहणारे खड्डे, नाले ओलांडण्याचा धोका पत्करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Tags:

sanikoppa bike fall in river