विधानपरिषदेचे सभापतीपद आपल्याला देण्यावरून भाजप गोटात किरकोळ मतभेद असले तरी ते सर्व आता मिटले आहेत, पक्षाचे दिग्गज नेते दिलेल्या शब्दाला जागतील, असा विश्वास विधान परिषदेचे सदस्य माजी सभापती आ. बसवराज होरट्टी यांनी विश्वास व्यक्त केला.
हुबळीमध्ये आज, गुरुवारी पत्रकारांशी बोलताना बसवराज होरट्टी म्हणाले की, राजकारणात किरकोळ मतभेद असतातच. इथेही एक प्रकारचा संवादाचा अभाव जाणवत होता. तो आता दूर झाला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, बी. एस. येडियुरप्पा, जगदीश शेट्टर आणि इतर नेते त्यांनी आपला शब्द पाळतील अशी आशा आहे.
पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत या विषयावर सर्वानुमते निर्णय घेण्यात आला असून अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पक्षातील काहींनी या पदाची मागणी केली होती. पण आता सगळे ठीक आहे. सर्वांनी एक निष्कर्ष काढला आहे, नेते आपला शब्द पाळतील, असेही ते म्हणाले. बाईट


Recent Comments