देशरक्षणासाठी जशी सैनिकांची गरज असते त्याचप्रमाणे एका कुटुंबासाठी आई देखील महत्वाची असते, महिलांनी मन लावले तर त्या काहीही साध्य करू शकतात याचा पुरावा क्रांती महिला मंडळाच्या महिलांकडे पाहिल्यावर मिळतो, असे मत माजी सैनिक नागेश कळसन्नवर यांनी व्यक्त केले.
बेळगावमधील क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोमटेश विद्यापीठाच्या सभा भवनात महात्मा गांधी जयंती च्या औचित्याने भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक नागेश कळसन्नवर हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उमा संगीत प्रतिष्ठान आणि क्रांती महिला मंडळाच्या सदस्यांच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेत १५ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत निनाद ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला. तर दुसऱ्या स्थानी साधना ग्रुप आणि तिसऱ्या स्थानी सद्गुरू भजनी मंडळाने बहुमान मिलविला. संगम ग्रुप, अत्तिमाब्बे ग्रुप आणि माउली भजनी मंडळाने उत्तेजनार्थ पारितोषिके पटकाविली.
नम्रता जहागीरदार आणि ज्योत्स्ना राकेश यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमात माजी सैनिक मडिवाळाप्पा क्लबांनी, अरुण मुरुगोड, गंगेश हेगडे, विरुपाक्ष तिलगंजी आदींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मंडळाच्या श्रीदेवी कागतीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गोमटेश विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. मंडळाच्या अध्यक्षा मंगला मठद यांनी ऑस्ट्रेलियातून या कार्यक्रमाला व्हर्च्युअल उपस्थिती लावली. शिवानी कस्तुरी आणि विना गडतन्नावर यांनी ईशस्तवन केले. त्रिशाला पायाप्पाण्णावर यांनी स्वागत केले. रत्नाश्री गुडेर यांनी प्रास्ताविक केले. पुष्पा निलंजगी आणि अश्विनी नवले यांनी आभार मानले. रोहिणी इंडी यांनी सूत्रसंचालन केले.


Recent Comments