दुचाकीवरून रस्ता ओलांडताना भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेबाडी तालुक्यातील मनगुळी येथे झाला.

12 वर्षीय रियाझ असे मृत मुलाचे नाव असून दुचाकीस्वार गंभीर जखमी आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची मनगुळी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.


Recent Comments