संपूर्ण जीवन कष्टमयी प्रवास करणाऱ्या बांधकाम कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, या कामगारांना न्याय देण्यात यावा यासाठी आज निपाणी येथील बांधकाम कामगार संघटनेने निपाणी तहसीलदारांना रॅलीच्या माध्यमातून निवेदन सादर केले.

बांधकाम कामगारांच्या विविध समस्या, कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, मोफत महाविद्यालयीन शिक्षण, गवंडी कामगारांना हक्काच्या घरकुलासाठी सरकारी मदत, महत्वाच्या सणासाठी बोनस, कामगारांसाठी सरकारी दवाखाना यासह विविध सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी निवेदन सादर करण्यात आले.

बांधकाम कामगार अनेक समस्यांना तोंड देत आहेत. बांधकाम कामगारांकडे सरकारचे आणि अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होत असून त्यांच्या समस्या मार्गी लावण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी लाल बावटा कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निपाणी तहसीलदार कार्यालयातील शिरस्तेदार अभिजीत बोगाळे यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले.
यावेळी कामगार नेते सी ए खराडे, धनाजी कांबळे, प्रवीण नायकवडे, अनिल ढेकळे, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बांधकाम कामगार संघटना सचिव बाबुराव कदम, संजय सुतार, किरण रानमाळे, विनायक पाटील, अनिल कापसे, अजित कांबळे, यांच्यासह लाल बावटा कामगार संघटनेचे पदाधिकारी, कामगार, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


Recent Comments