Belagavi

कडोली विठ्ठलबीरदेव मंदिर कळस निर्मितीसाठी धर्मस्थळचे सहकार्य

Share

कडोली येथील जागृत ग्राम देवता व धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलबिरदेव मंदिराच्या कळस निर्माण कार्याला धर्मस्थळ ग्रामविकास संघ योजनेतून दीड लाखांची देणगी देण्यात आली असून देणगीच्या रकमेचा धनादेश संघाचे जिल्हा संचालक प्रदीप शेट्टी आणि योजनाधिकारी नागराज हदली यांच्याहस्ते कमिटीकडे सुपूर्द करण्यात आला.

या कार्यासाठी आमदार सतीश जारकीहोळी यांच्या निधीतून देखील पाच लाखांची देणगी देण्यात येणार आहे, अशी माहिती आमदारांचे आप्त कार्यदर्शी मलगौडा पाटील यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, माजी ग्राम पं.अध्यक्ष अण्णु कटांबळे, धर्मस्थळ संघाचे प्रदीप शेट्टी, योजनाधीकारी नागराज हदली, राजु सुतार, माजी ग्रा.पं.अध्यक्ष राजु मायाण्णा, ग्रा.पं.उपाध्यक्षा रेखा नरोटी,माजी ग्रा.पं.उपाध्यक्षा प्रेमा नरोटी,माजी ग्रा.पं.अध्यक्ष दत्ता सुतार, ग्राम पं.सदस्य राजु कुट्रे,ग्रा.पं.सदस्या लक्ष्मी कुट्रे व कडोली भागातिल धर्मस्थळ संघाचे सुपरवाइजर नागाप्पा एच.आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मलगौडा पाटील म्हणाले, सतीश जारकिहोळी हे आपल्या मिळकती पैकी १०% रक्कम समाज सेवेसाठी खर्च करत धनगर समाजातर्फे स्वत:ची जागा उपलब्ध करुन दिल्यास अधिक निधी खर्चून समुद भवन देखील बांधून देण्यात येणार आहे. याचप्रमाणे अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी अण्णु कटांबळे बोलताना म्हणाले, प्रभुदेव डोंगरातील प्रभुदेव मंदिर बाधण्यासाठी धर्मस्थळ संघाकडे मागणी करुन विनंती अर्जही दिला होता. याचा विचार करून धर्मस्थळ संघाने दिलेली देणगी हि बहुमोल असल्याचे ते म्हणाले.

यावेळी श्री विठ्ठल बिरदेव जीर्णोद्धार कमिटीचे पदाधिकारी, महिला, युवक मंडळ, समाज बांधव, श्री धर्मस्थळ ग्रामविकास संघाच्या महिला सेवाप्रतिनिधी रेखा पाटील, महिला पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कमिटीचे अध्यक्ष गजानन कागणिकर यांनी प्रास्ताविक तर जनजागरण संस्थेचे संजय उपरी यांनी सुत्रसंचलन केले. कल्लाप्पा नरोटी यांनी स्वागत व महादेव नरोटी यांनी आभार मानले.

Tags:

kadoli vitthaldev mandir pooja