Chikkodi

भरून वाहणाऱ्या नाल्यातून अप्पाचीवाडीत हालसिद्धनाथांची पालखी

Share

बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी तालुक्यातील कुर्ली गावातून हजारो भाविकांनी हालसिद्धनाथाची पालखी दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यातून अप्पाचीवाडी गावात नेली.

हालसिद्धनाथ जत्रेसाठी दरवर्षी कुर्ली गावातून अप्पाचीवाडी येथे पालखी नेली जाते. नंतर दोन्ही गावातील लोक एकत्र येऊन पाच दिवस भव्य जत्रा भरतात. या दोन गावांच्यामध्ये घुमट नाला वाहतो. हा नाला वेदगंगा नदीजवळ आहे.

गेल्या दोन दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, पाण्याचा नदी-नाल्यांचा प्रवाह वाढला आहे. जत्रेच्या पार्श्‍वभूमीवर कुर्ली गावातून अप्पाचीवाडी येथे पालखी नेणे आवश्यक असल्याने भाविकांनी नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाची पर्वा न करता पालखी वाहून नेली. महिलांनी आरती करत नाला पार केला हे विशेष. पालखीसोबत शेकडो लोक पायी चालत गेले.

Tags:

chikkodi halsiddhanath pallakki