चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या कागवाड येथे जनसंपर्क सभेचे आयोजन करण्यात आले होते. खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली जनसंपर्क सभा यशस्वीरित्या पार पडली.

खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या जनसंपर्क सभेत कागवाड मतदार संघातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली.

चिकोडी मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून कागवाड मतदार संघातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन बहुतेक समस्या जागेवरच सोडवण्याचे समाधान आपल्याला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केली. ()
या सभेत जनतेच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. मंदिर जीर्णोद्धार, रस्ता दुरुस्ती, शाळांच्या समस्या यासह विविध समस्यांसंदर्भात येथील जनतेने आपली मते मांडली. विविध मागण्या करत निवेदने सादर केली.
या सभेत कागवाड चे तहसीलदार राजेश बुरली, शिक्षणाधिकारी एम आर मुंजे, सीडीपीओ संजीवकुमार सदलगे, व अन्य अधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी भाजपाचे कागवाड मंडल अध्यक्ष तमन्ना पारशेट्टी, चिकोडी युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पाटील, डी के एस एस कारखान्याचे संचालक अण्णासाहेब पाटील, आधुनिक एलडी बँकेचे अध्यक्ष शीतल पाटील, माझी जिल्हा पंचायत सदस्य रवींद्र पुजारी, चंद्रकांत बाडगे, रामगौडा पाटील, खासदारांचे आप्तसहायक विनायक हिरेमठ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


Recent Comments