Vijayapura

आरक्षण वाढीचे काँग्रेस नेत्यांना दुःख : आर. एस. पाटील

Share

एससी – एसटी आरक्षणातील वाढ काँग्रेसच्या नेत्यांना सहन होत नाही, असा टोला विजापूर भाजप जिल्हाध्यक्ष आर. एस. पाटील यांनी लगावलाय.

विजापूरमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनुसूचित जाती जमातीला वाढीव आरक्षण मिळावे अशी अनेक दिवसांपासून मागणी होत असून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या पूर्ण करून भाजपने आपण सामाजिक न्यायासाठी उभे असल्याचे सिद्ध केले आहे. यामुळे काँग्रेसची निराशा झाली आहे. यासंदर्भात संसदेत राष्ट्रपतींच्या स्वाक्षऱ्या होणे बाकी आहे. वाढीव आरक्षणावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी नक्की होईल, असा विश्वास आर एस पाटील यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला बेळगाव विभागाचे प्रभारी चंद्रशेखर कवटगी, राज्य ओबीसी मोर्चा प्रधान सचिव विवेकानंद डब्बी, जिल्हा प्रधान सचिव बसवराज बिरादार, मल्लिकार्जुन जोगुर, शिवरुद्र बागलकोट, जिल्हा प्रवक्ते सुरेश बिरादार, शहर मंडळ अध्यक्ष मुळुगौड पाटील, जिल्हा माध्यम संचालक विजय जोशी, सिद्दू मल्लिकार्जुनमठ आदी उपस्थित होते.

Tags: