सेवा निवृत्तीनंतरही माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून माजी सैनिकांनी या सर्व सुविधांचा लाभ अवश्य घयावा, असे आवाहन बेळगाव सैनिक कल्याण आणि पुनर्वसन विभागाच्या सहसंचालिका इंदुप्रभा व्ही. यांनी केले.

व्हॉइस : चिकोडी येथील केशव कला भवनात राष्ट्रीय माजी सैनिक समन्वय समिती चिकोडी घटक आणि जिल्ह्यातील सर्व घटकांच्या सहयोगाने आयोजिण्यात आलेल्या भव्य माजी सैनिक मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ८० वर्षांवरील माजी सैनिकांसाठी २० टक्के, ८५ ते ९० वर्षांपर्यंतच्या माजी सैनिकांना ३० टक्के आणि ९१ ते ९५ वर्षाच्या माजी सैनिकांसाठी ४० टक्के तसेच १०० वर्षांवरील माजी सैनिकांसाठी १०० टक्के पेन्शन देण्यात येत आहे. माजी सैनिकांच्या मुलांचे शिक्षक, मुलींचा विवाह, अपंग बालकांना पेन्शन यासह विशेष सवलती देण्यात येत आहेत. माजी सैनिकांच्या प्रशासकीय समस्या सोडविण्यासाठी सैनिक कल्याण व पुनर्वसन विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन इंदुमती व्ही यांनी केले.
यावेळी लेफ्टनंट कर्नल सी बी नंदकुमार बोलताना म्हणाले, माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकारी तत्पर आहेत. माजी सैनिकांच्या किरकोळ समस्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात परस्पर सहकार्याने सोडवल्या पाहिजेत. तसेच काही गंभीर समस्या असतील तर त्या संबंधित लष्करी अधिकाऱ्यांना भेटून ते सोडवू शकतात असे ते म्हणाले.
बेळगावचे एमएलआयसी सिनियर रेकॉर्ड ऑफिसर ले. कर्नल देबाशीस डे यांनी यांनी बदललेल्या पेन्शन प्रक्रियेची माहिती दिली. राष्ट्रीय माजी सैनिक समन्वय समितीचे ज्येष्ठ सदस्य ज्ञानदीप कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बाळासाहेब संगरोळे, समिती राज्याध्यक्ष टी एस पाटील, प्रधान सचिव बसवराज निंगंगादर, नगरपालिका उपाध्यक्ष संजय कवटगीमठ, बसवराज वन्नुर, पी व्ही कोरगलमठ, अज्जाप्पा कुरबर, एम एस हरगबाळ, एच आर कुलकर्णी, पीएसआय लक्ष्मण आरी, अशोक कोरे, राजू बसन्नवर, अशोक वाळके, प्रकाश वाळके, चिकोडी युनिटचे सर्व सदस्य आणि विविध घटकांचे पदाधिकारी, माजी सैनिक आदी उपस्थित होते.
राजू सुनगार यांनी स्वागत केले, अशोक मूरचिट्टी यांनी शपथ देवविली. अजित संगरोळे यांनी परिचय करून दिला तर कल्लाप्पा वटारे यांनी आभार मानले, रमेश बस्तवाडे यांनी प्रास्ताविक केले तर नेमगौडा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.


Recent Comments