Belagavi

बेळगाव जिल्हा शिवसेनेकडून मशाल चिन्हावर विजयोत्सव

Share

महाराष्ट्रात दोन तुकडे झालेल्या शिवसेना पक्षात, केंद्रीय निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल चिन्ह दिल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावात शिवसेना जिल्हा शाखेतर्फे विजयोत्सव साजरा करण्यात आला.

रामलिंगखिंड गल्ली येथील शिवसेना कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाच्या घोषणा देत फटाके फोडून विजय साजरा केला.

यावेळी बोलताना शिवसेना सीमाभाग संपर्क प्रमुख अरविंद नागनूरी म्हणाले, आमच्या शिवसेना पक्षाला मशाल चिन्ह मिळाले आहे. सीमाभागात पक्षाचे संघटन मजबूत करू. यातून उद्धव ठाकरेंना बळ देण्याचे काम करू, असे ते म्हणाले.

याप्रसंगी शिवसेना सीमाभाग जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, राजकुमार बोकडे, दिलीप बैलूरकर, महेश टांकसाळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Tags:

belgaum shivsena